कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे सकारात्मक आश्वासन

  धुळे दर्पण न्यूज :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली धुळ्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे धुळ्यात तंत्र कृषी विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी आग्रही मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कृषीमंत्री कोकाटे यांनी लवकरच धुळ्यात कृषी विद्यापीठाचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे डॉ. बच्छाव यांनी सांगितले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  धुळे शहरात सुमारे ५०० एकर जागेवर कार्यरत असलेले कृषी महाविद्यालय हे सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी याच्याशी संलग्न आहे. हे महाविद्यालय धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञान सेवा पुरवते. येथे बी.एस्सी. (कृषी) आणि एम.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रम शिकवले जातात. मात्र राहुरी कृषी विद्यापीठाचा कार्यक्षेत्र खूप मोठे असल्यामुळे प्रशासनाला सर्व जिल्ह्यांमध्ये एकसमान लक्ष देणे कठीण होते. त्यामुळे धुळ्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ झाल्यास शिक्षण, संशोधन आणि विस्तार या सर्वच क्षेत्रांना गती मिळणार आहे.

- Advertisement -

  विशेष म्हणजे, धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान, संशोधन आणि मार्गदर्शनाचा थेट फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे आधुनिक शेतीत प्रगती साधणे शक्य होईल. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, शेतकरी आणि विविध संघटनांकडून धुळ्यात कृषी विद्यापीठाची मागणी सातत्याने करण्यात येत होती. आंदोलनेही करण्यात आली. हे महत्त्व समजावून सांगताना खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी कृषीमंत्री कोकाटे यांना धुळे जिल्ह्याच्या शेतकरी हिताच्या दृष्टीने स्वतंत्र कृषी विद्यापीठाची नितांत गरज पटवून दिली.

  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीदेखील या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच धुळ्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठाच्या स्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे धुळे जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -