गुलमोहर घबाड प्रकरण : “आम्हाला नाही अब्रू, आणि आम्ही कोणाला घाबरू!” – माजी आमदार अनिल गोटे यांचा स्फोटक आरोप
त्यांनी थेट आरोप केला की, “महाराष्ट्र आमदारांची नवी घोषणा ‘हम सब चोर है, और नंगे भी.’” गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणातील लाखो-कोटींच्या खंडणीचे पैसे जमा झाले तरी राज्यातील कोणत्याही आमदाराला सभागृहात आवाज उठवण्याची हिंमत झाली नाही, हेच या लोकप्रतिनिधींच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
📣 पत्रकार परिषदेतून उघडकीस आणलेले प्रश्न
२७ जुलै २०२५ रोजी कल्याण भवन, शिवतीर्थ जवळ, धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोटे यांनी अनेक धक्कादायक बाबी मांडल्या :
![]() |
| - Advertisement - |
⚖️ पोलीस तपासावर गंभीर शंका
अनिल गोटे यांनी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना थेट लिहिलेल्या पत्रात असे म्हटले की, “गुलमोहर घबाड प्रकरणाचा तपास हेतुपुरस्सर संथ गतीने सुरू आहे. आरोपींना मदत केली जात आहे.”
त्यांनी सांगितले की,
- न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला असतानाही ६० दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी प्रमुख आरोपी व त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली नाही.
- “गुलमोहर” रेस्ट हाऊस, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच हॉटेल टॉप लाईन, मानस, कृष्णाई इत्यादींचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी दिलेले नाही.
- सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) सुद्धा आजतागायत ताब्यात घेण्यात आलेले नाहीत.
![]() |
| - Advertisement - |
📌 गुलमोहर रेस्ट हाऊसचा व्यवहार आणि गायब झालेली प्रतिष्ठा
🏛 “सलाम माझ्या गांडूपणाला सलाम”
माजी आमदार गोटे यांनी कवि मंगेश पाडगावकरांच्या कवितेचा दाखला देत म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले की एसआयटी स्थापन करणार, पण दोन दिवस झाले, दोन महिने झाले, तरी का नाही झाली? एवढे विचारण्याचेही धाडस आमदारांमध्ये राहिले नाही का? मग मला वाटते, सलाम माझ्या गांडूपणाला सलाम!”
📝 पत्रातून पोलिसांना प्रश्नांचा भडिमार
आपल्या पत्रात अनिल गोटे यांनी पोलिसांना विचारले:
- आरटीओची जीप, वनविभागाची गाडी, हॉटेलमधील गर्दी – हे फुटेजमध्ये दिसले का नाही?
- ज्या आमदारांसाठी खंडणी जमा केली गेली, त्यांचे सीडीआर का घेतले नाहीत?
- तपासकामी मला (अनिल गोटे) आणि नरेंद्र परदेशी यांचे सहकार्य का घेतले नाही?
⚠️ पोलिसांना थेट इशारा
“आयपीसी कलम २१७ आणि २१८ अंतर्गत तुमच्यावर (पोलीस अधिकाऱ्यांवर) कारवाई करावी लागेल; गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावेन,” असा इशाराही त्यांनी दिला.
🎬 “हम सब चोर है और नंगे भी है”
माजी आमदार अनिल गोटे म्हणाले, “मागे एक हिंदी सिनेमा आला होता – ‘हम सब चोर है’. आता तर नवीन सिनेमा निघायला हवा – ‘हम सब चोर है और नंगे भी है’. कारण आता लोकप्रतिनिधींना लाज राहिलेली नाही.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
✅ धुळेकर जनतेचे लक्ष
या प्रकरणात पुढे काय घडते, पोलिसांचा तपास निष्पक्ष होतो का, एसआयटी खरोखरच स्थापन होते का, हे पाहणे आता धुळेकर जनतेसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



