धुळे दर्पण न्यूज :- रक्षाबंधनाच्या सणाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील लाखो बहिणींना आनंदाची बातमी मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी बहिणींना जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणून प्रत्येकी रु. १५०० थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या निर्णयाच्या मागे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन असून, राज्य सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष सन्मान देण्याचा हा प्रयत्न केला आहे.
थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून निधी वितरण
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer - DBT) पद्धतीने जमा केला जाईल. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागणार नाही, किंवा कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही.
![]() |
| - Advertisement - |
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हेतू
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या सन्मानाचे जतन करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे व महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. दरमहा रु. १५०० इतका सन्मान निधी दिला जात असून, त्याचा थेट लाभ महिलांच्या दैनंदिन गरजांमध्ये होताना दिसतो आहे.
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त विशेष आनंद
रक्षाबंधन हा भाऊ–बहिणींच्या नात्याचा सण मानला जातो. अशा वेळी सरकारने लाडक्या बहिणींना आर्थिक पाठबळ देत त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे. जुलै महिन्याचा सन्मान निधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येसच वितरित होणार असल्याने या सणाचा आनंद दुप्पट होईल, असे प्रशासनाने सांगितले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सरकारकडून आवाहन
सरकारने सर्व पात्र लाभार्थी बहिणींना आपले बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सन्मान निधी वेळेवर खात्यात जमा होऊ शकेल.


