धुळे दर्पण न्यूज :- शिरपूर तालुक्यातील लौकी गावात झोपडीत राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेला महावितरणकडून ८३ हजार रुपये एवढ्या भरमसाठ रकमेचे वीजबिल पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे या महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
फक्त एक बल्ब आणि एक टेबल फॅन, तरीही ८३ हजारांचे बिल!
झोपडीत राहत असलेल्या इंदूबाई हिरालाल भील या महिलांच्या घरात वीजेचा वापर अत्यंत मर्यादित असून, केवळ ६० वॅटचा एक बल्ब आणि एक टेबल फॅन एवढेच साहित्य आहे. एवढ्या कमी वापरानंतरही त्यांना दोन महिन्यांत तब्बल ८३ हजारांचे बिल प्राप्त झाले आहे. हे बिल पाहून संपूर्ण कुटुंब हादरले असून, वृद्ध महिलेला तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
![]() |
| - Advertisement - |
चार महिन्यांपूर्वी जोडली वीज... अन् सुरू झाली 'आफत'
इंदूबाई यांच्या झोपडीला चार महिन्यांपूर्वी महावितरणकडून वीज जोडण्यात आली होती. सुरुवातीस सर्व काही सुरळीत चालले होते, परंतु मागील दोन महिन्यांपासून त्यांना भरमसाठ बिलांची आकारणी होऊ लागली. या संदर्भात त्यांच्या मुलाने महावितरण कार्यालयात वारंवार तक्रार केली, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
ग्रामस्थांचा संताप; सोशल मीडियावरूनही निषेध
या प्रकारावर गावकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावरूनही महावितरणच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे. "एका बल्ब आणि फॅनसाठी इतकं बिल? म्हणजे हे सरळ सरळ आर्थिक शोषण आहे!" अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
![]() |
| - Advertisement - |
विभागाकडून निष्काळजीपणा, कोणतीही दखल नाही
ग्राहकांच्या घरी न परवानगी घेता मीटर बदलणे, मीटर बदलल्यानंतर सरासरीच्या नावाखाली चुकीची आकारणी करणे यामुळे अनेक सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. इंदूबाई यांना आलेल्या अवाजवी बिलामुळे ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व संबंधित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



