धुळे दर्पण न्यूज :- अखंड भारत संकल्प दिनानिमित्त आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात एक भव्य-दिव्य देशभक्तीचा सोहळा रंगणार आहे. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे येत्या गुरुवारी (ता. १४ ऑगस्ट) ११११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजासह भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेत देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारताचा संदेश देत, धुळेकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होणार आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या पदयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रख्यात फ्री लान्स कमांडो मेंटर, कमांडो ट्रेनर व मिशन प्रहार चे संस्थापक ग्रँडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज यांची उपस्थिती. त्यांच्या सोबत आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

कार्यक्रमाचा तपशील

  ही पदयात्रा गुरुवारी सकाळी ९ वाजता मालेगाव रोडवरील छत्रपती श्री अग्रसेन महाराज चौक येथून सुरू होऊन महात्मा गांधी पुतळा येथे समारोपास येईल. मार्गक्रमणादरम्यान पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पाचकंदील, आणि जुना आग्रा रोड मार्गे पुढे जाईल. पदयात्रेच्या अखेरीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ आयोजित सभेत ग्रँडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज व आमदार अनुप अग्रवाल मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होईल.

देशभक्तीचा संदेश आणि आवाहन

  या पदयात्रेत तिरंगा ध्वज फडकवत देशप्रेम, ऐक्य आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश दिला जाणार आहे. आयोजक अॅड. रोहित चांदोडे (अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य संघटना) यांनी आवाहन केले आहे की, “धुळेकरांनी पक्षभेद बाजूला ठेवून, मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे आणि तिरंग्याचा मान वाढवावा.”

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  धुळे शहर देशभक्तीच्या लाटेत न्हाऊन निघणार असून, ११११ फूट तिरंगा ध्वज हा दृश्य सोहळा प्रत्येक नागरिकासाठी अविस्मरणीय ठरणार आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -