धुळे दर्पण न्यूज :- शहरातील पाचकंदील आणि जुन्या आग्रा रोड परिसरातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या जागेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे. “कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, लवकरच सर्व विक्रेत्यांचे पुनर्वसन करून जागा उपलब्ध करून दिली जाईल,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. यासाठी १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त तसेच विक्रेते व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठक होणार असून त्यातून सर्वमान्य निर्णय घेण्यात येणार आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

दीड महिन्यापासून व्यवसाय बंद

  महापालिकेने पाचकंदील आणि आग्रा रोड परिसर नो-हॉकर्स झोन म्हणून घोषित केल्यामुळे येथील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना मागील दीड महिन्यापासून व्यवसाय करण्यास बंदी आहे. या निर्णयामुळे अनेक विक्रेत्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अडचणी दूर करण्यासाठी रविवारी धुळे व्हेजिटेबल असोसिएशन आणि कमिशन एजंट संघटनेचे अध्यक्ष तसेच छत्रपती संभाजीराजे लोटगाडी युनियनचे पदाधिकारी, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांच्या नेतृत्वाखाली विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने आमदार अग्रवाल यांची भेट घेतली.

- Advertisement -

बैठकीत विक्रेत्यांच्या मागण्या मांडल्या

  भाजीपाला विक्रेत्यांनी आग्रा रोडवरील व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तसेच मनपाच्या मालकीच्या चारही मार्केटचे पुनर्बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.


मार्केटचे पुनर्बांधकाम व कायमस्वरूपी ओटे

  यावर प्रतिक्रिया देताना आमदार अग्रवाल म्हणाले, “महापालिकेच्या चारही मार्केटचे पुनर्बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची निविदा पुढील महिन्यात काढली जाईल आणि अंदाजे दीड वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भाजीपाला विक्रेत्यास कायमस्वरूपी ओटा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच फळ विक्रेत्यांनाही स्वतंत्र ओटे दिले जातील.”

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

नेत्यांचा सहभाग

  या चर्चेला भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, हिरामण गवळी, भिकन वराडे आदींची उपस्थिती होती.

  भाजीपाला विक्रेत्यांच्या पुनर्वसनाच्या या प्रक्रियेला गती मिळाल्यास, दीर्घकाळ चाललेला जागेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आता १४ ऑगस्टच्या बैठकीत नेमका निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -