धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरात असंतोषाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार आणि भाषा अभ्यासक व भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब यांनी आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:  

  या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. पवार यांनी सांगितले की, “रोजगारासाठी हिंदी भाषेत प्रचंड प्रमाणावर लोक महाराष्ट्रात येत आहेत; त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा मोठ्या संख्येने बाहेरून येत आहेत. मराठी भाषेला बाजूला सारून तिसऱ्या भाषेची सक्ती करणे ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टीने घातक बाब आहे. आम्ही याविरोधात सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली असून, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांसारख्या काही पक्षांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.”

- Advertisement -

  तिसऱ्या भाषेची सक्ती थांबवण्यासाठी ग्रामसभांनी ठराव करावा, ई-मेल आणि पत्रांद्वारे शासनाला मोठ्या प्रमाणावर कळवावे, अशी जनतेला विनंती करण्यात आली. “सरकारला इतकी पत्रे पाठवावीत की मंत्रालयातील पत्रं हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना कंटाळा यावा,” असेही पवार म्हणाले.

  डॉ. परब यांनी भाषणात नमूद केले की, “मराठी भाषा हा फक्त भाषिक प्रश्न नाही, तर महाराष्ट्राच्या एकात्मतेचा आणि सांस्कृतिक अस्तित्वाचा प्रश्न आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या संख्याबळाच्या जोरावर हिंदीचे वर्चस्व वाढू पाहत आहे, तर काही आर्थिक घटकांमुळे गुजराती भाषेचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही प्रवृत्ती रोखली नाही तर महाराष्ट्राच्या अखंडतेला धोका निर्माण होईल.”

  या लढ्यासाठी समितीने संपूर्ण राज्यात दौरे आयोजित केले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, मंगळवेढा, धाराशिव, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही महिन्यांत जनजागृती कार्यक्रम होतील. यामध्ये स्थानिक पत्रकार, शिक्षक संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांचा सहभाग राहील.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."  

  पत्रकार परिषदेत हेही स्पष्ट करण्यात आले की, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाल मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी येईल की नंतर, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. मात्र, कोणताही अहवाल आला तरी तिसऱ्या भाषेची सक्ती मान्य केली जाणार नाही, असा ठाम निर्धार या चळवळीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

  “हा लढा आमच्या मनातल्या आकारापेक्षा मोठा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा हा दुसरा पर्व आहे. विरोधकांकडे प्रचंड पैसा, सत्ता आणि संघटनशक्ती असली तरी, मराठी माणसाने एकजुटीने उभे राहून आपली भाषा आणि संस्कृती वाचवली पाहिजे,” असे आवाहन डॉ. पवार आणि डॉ. परब यांनी संयुक्तपणे केले.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com 

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -