धुळे दर्पण न्यूज :-  देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या १०३ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला जीएसटीच्या जाचातून मोठा दिलासा देणारी घोषणा केली. येत्या दिवाळीपासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) दरात व्यापक फेरबदल करून दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त करण्याचा निर्धार पंतप्रधानांनी जाहीर केला.

  त्यांनी सांगितले की, “जीएसटीला ८ वर्षे झाली आहेत. आम्ही त्याचा संपूर्ण आढावा घेतला असून, कर प्रणाली अधिक सोपी व पारदर्शक करण्यासाठी बदल करीत आहोत. दैनंदिन जीवनातील वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, यामुळे सर्वसामान्य जनतेचा खर्च कमी होईल आणि एमएसएमई क्षेत्राला मोठा फायदा मिळेल.”

- Advertisement -

जीएसटीचे नवे टप्पे

  केंद्र सरकारच्या सूत्रांनुसार, सुधारित जीएसटी दर पुढीलप्रमाणे असतील –

  • जीवनावश्यक वस्तू – ५% व १८% कर दर
  • लक्झरी वस्तू, मद्य, तंबाखू, अमली पदार्थ, जुगार – ४०% विशेष कर
  • सध्याच्या १२% टप्प्यातील ९९% वस्तू आता ५% दराखाली
  • २८% टप्प्यातील ९०% वस्तू आता १८% दराखाली

  पेट्रोलियम उत्पादने मात्र जीएसटीबाहेरच ठेवण्यात येणार असून, हिरे व महागड्या रत्नांवरील कर पूर्ववत राहतील.


विकसित भारत रोजगार योजना

  जीएसटी बदलांसोबतच पंतप्रधानांनी ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळणार असून, त्यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -


राष्ट्रीय सुरक्षेसाठी नवे पाऊल

  • मिशन सुदर्शन चक्र – शत्रूच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या ‘आयरन डोम’सारखी स्वदेशी सुरक्षा प्रणाली विकसित केली जाणार.
  • स्वदेशी जेट इंजिन – परदेशी अवलंबित्व कमी करून स्वदेशी जेट इंजिन निर्मितीसाठी तरुण वैज्ञानिक व अभियंत्यांना प्रोत्साहन.
  • अणु धमक्या सहन करणार नाही – देशाच्या सुरक्षेला धोका देणाऱ्या कोणत्याही अणु किंवा दहशतवादी कारवायांना कठोर उत्तर दिले जाईल.

लोकसंख्येतील बदलांबाबत इशारा

  पंतप्रधानांनी देशातील बदलत्या लोकसंख्येच्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, घुसखोर तरुणांच्या रोजगारावर गदा आणत आहेत, तसेच आदिवासींच्या जमिनी बळकावत आहेत. सीमावर्ती भागात होणारे लोकसंख्यात्मक बदल राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.


आरएसएसचा गौरवविरोधकांचा टोला

  पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. मात्र काँग्रेसने टीका करताना हा उल्लेख मोहन भागवतांना खूश करण्यासाठी असल्याचा आरोप केला.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."


  या बदलांमुळे दिवाळीनंतर बाजारपेठेत महत्त्वाचा ‘डबल धमाका’ होणार असून, सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातील व्यापारी, ग्राहक व लघुउद्योग क्षेत्र याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.


धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू मा

ध्यम


- Advertisement -