लळिंग उपचार केंद्रात हलवला, अजून बिबटे असण्याची शक्यता व्यक्त
धुळे दर्पण न्यूज :- शिरपूर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने बुधवारी अखेर जेरबंद केले. काटेरी झुडपात अडकलेल्या या आजारी बिबट्याला पकडण्यासाठी तब्बल तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
बिबट्याला प्राथमिक उपचार करून पुढील काळजीसाठी लळिंग येथील उपचार केंद्रात हलवण्यात आले असून, पूर्णपणे बरे झाल्यावर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.
गेल्या पंधरा दिवसांची दहशत
शिरपूर परिसरात बिबट्याच्या हालचालीमुळे ग्रामस्थ भयभीत होते.
१५ दिवसांपूर्वी शेतकरी छोटू मराठे यांच्या शेतात गाईचे पिलू बिबट्याने ठार केले होते.
बुधवारी सकाळी लकड्या नाला परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला मिळाली.
![]() |
| - Advertisement - |
तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन
निमझरी रस्त्यावरील भिलाट देवजवळील लकड्या नाल्याजवळ वन विभागाची टीम पोहोचली.
त्यात बिबट्या काटेरी झुडपात अडकलेला आढळला.
सहाय्यक वनसंरक्षक राहुल घरटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले.
वनजीव अभ्यासक योगेश वरुडे, वनपाल कपिल पाटील, वनपाल आर.ए. पाटील, भारती राजपूत, वनरक्षक मनीष देशमुख, स्वप्नील पाटील या पथकाने बिबट्याला सुरक्षित पकडले.
पशुधन अधिकारी कुलदीप भामरे यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले.
बिबट्याची प्रकृती व वय
- साडेतीन वर्षांचा नर बिबट्या असल्याचे वन विभागाने सांगितले.
- फूड पॉईजनमुळे तो आजारी झाल्याचे निदर्शनास आले.
पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे हलवण्यात आले असून पूर्ण बरे झाल्यावर जंगलात सोडले जाईल.
![]() |
| - Advertisement - |
अजून बिबटे असण्याची शक्यता
या भागात मका, ऊस, पपईची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने हा परिसर बिबट्यांच्या अधिवासासाठी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
त्यामुळे अजून बिबटे असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
अधिकाऱ्यांचे प्रतिपादन
“बिबट्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे.”
– राहुल घरटे (सहाय्यक वनसंरक्षक)
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A. (MCJ))
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



.jpg)