ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी व क्राईम सीन ॲप्लिकेशनच्या साहाय्याने घटनास्थळावर त्वरित तपासणी

  धुळे दर्पण न्यूज :-धुळे पोलिस दलाला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक लॅब व्हॅन प्राप्त झाली असून, यामुळे गुन्ह्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी अधिक वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह होणार आहे. शासनाकडून मिळालेल्या या फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या वापरास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत परवानगी दिली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

काय आहे या फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनची वैशिष्ट्ये?

  • ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) चा वापर
  • क्राईम सीन ॲप्लिकेशनद्वारे घटनास्थळी त्वरित तपासणी
  • रक्त, डीएनए नमुने, बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यांतील पुरावे सुरक्षित जतन
  • बारकोड व सीसीटीव्हीद्वारे पुराव्यांचे काटेकोर संरक्षण
  • सायबर गुन्हे व स्फोटक तपासणीसाठी लागणारे साहित्य सज्ज
  • घटनास्थळाचे छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुविधा

- Advertisement -

गुन्हा घडताच पोलिसांना त्वरित मदत

  जेव्हा एखाद्या ठिकाणी गुन्हा नोंदवला जाईल, तेव्हा पोलीस नियंत्रण कक्षातून तातडीने फॉरेन्सिक पथकाला माहिती देण्यात येईल.
  व्हॅन तात्काळ घटनास्थळावर पोहोचेल, तज्ज्ञ पुरावे गोळा करतील, त्यांची नोंद क्राईम सीन ॲप्लिकेशनमध्ये करेल आणि आवश्यक असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करू शकतील.

तपास प्रक्रियेतील मोठी क्रांती

  फॉरेन्सिक मोबाईल लॅब कार्यरत झाल्यानंतर पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम व वैज्ञानिक पद्धतीने होईल.
  तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल, ज्यामुळे गुन्हेगारांसाठी सुटकेचे मार्ग बंद होतील.

- Advertisement -

धुळे पोलिस दलाला आणखी बळकटी

  मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व्यतिरिक्त धुळे पोलिसांना दोन नवीन २२ आसनी बसही देण्यात आल्या आहेत.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर या बसचा वापर पोलीस पथकांच्या हालचालीसाठी होणार आहे.

अधिकाऱ्यांचे प्रतिपादन

  “मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे.”
श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)

  “तपास यंत्रणेच्या हाती थेट अचूक आणि ठोस पुरावे मिळणार असल्याने संशयित गुन्ह्यातून सहज वाचणार नाहीत.”
श्रीराम पवार (पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेशन विभाग)


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A. (MCJ))
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -