धुळे दर्पण न्यूज :- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी केंद्र सरकारने दिलासा देणारी योजना सुरू केली आहे. ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना’ अंतर्गत पात्र मजुरांना वयोमानानंतर दरमहा ३ हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. योजनेचे नोंदणी अभियान २५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असून इच्छुकांनी आपल्या नजीकच्या नगर निगम, नगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, बीडीओ कार्यालय येथे जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेत सामील होण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला दरमहा किमान ५५ रुपये इतका हप्ता भरावा लागणार असून वयाच्या प्रमाणानुसार योगदानाची रक्कम बदलते.
- वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला दरमहा ३,००० रुपये पेन्शन खात्यात जमा होणार आहे.
- योगदान देताना सरकारकडूनही तितकाच हिस्सा जमा केला जाणार आहे.
![]() |
| - Advertisement - |
कोण अर्ज करू शकतात?
- असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर, कामगार, रिक्षा चालक, बांधकाम मजूर, शेतीमजूर, घरकाम करणाऱ्या महिला तसेच छोट्या स्वरूपाचे व्यवसाय करणारे नागरिक यांना या योजनेचा थेट लाभ मिळू शकतो.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- योजनेत सामील होण्यासाठी आधार कार्ड, बचत खाते व ई-श्रम कार्ड आवश्यक आहे.
नोंदणी प्रक्रिया
इच्छुक नागरिकांनी maandhan.in किंवा eshram.gov.in या संकेतस्थळांवरून माहिती घेऊन अर्ज करू शकतात. तसेच धुळे जिल्ह्यातील नागरिकांना नोंदणीसाठी नगरपालिका, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.
![]() |
| - Advertisement - |
मजुरांसाठी दिलासा
मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना वृद्धापकाळी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. वयोमानानंतर नियमित उत्पन्नाचे साधन मिळावे आणि आर्थिक सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना’ महत्त्वाची ठरणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



