Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली. आग्रा रोडने मार्गक्रमण करत महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. हातात विविध घोषवाक्ये असलेले फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. “आवाज नाही तर संस्कार वाढवा”, “शांतता हाच खरा उत्सव”, “बाय बाय डीजे”, “लेझरच्या झगमगाटात आमचे डोळे विझत आहेत” अशा घोषणांनी संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला.
![]() |
| - Advertisement - |
डॉ. रविंद्र वानखेडकर यांचे मार्गदर्शन
त्यांनी पुढे सांगितले की, वैद्यकीय अहवालानुसार डीजे व लेझरच्या तीव्रतेमुळे बहिरेपणा, दृष्टीदोष, हृदयविकार, रक्तदाब, डोकेदुखी यांसारख्या समस्या झपाट्याने वाढल्या आहेत. गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध, विद्यार्थी यांच्यावर सर्वाधिक परिणाम होत असून रुग्णालयातील रुग्णांना त्रास, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनात अडथळे, अभ्यासात व्यत्यय, वाहन अपघात, गर्दीत भांडणे अशा समस्या समाजासमोर उभ्या ठाकल्या आहेत.
आयएमएची ठाम भूमिका
![]() |
| - Advertisement - |
विविध संघटनांचा सहभाग
या मूक मोर्चात शहर व जिल्ह्यातील असंख्य संघटना, संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), निसर्ग मित्र समिती, बार कौंसिल, सीए असोसिएशन, व्यापारी महासंघ, होमिओपॅथी असोसिएशन, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इंडियन डेंटल असोसिएशन, शिक्षक संघटना, इंजिनिअर असोसिएशन, निमा संघटना, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, क्रेडाई, मराठा सेवा संघ, रोटरी क्लब, धुळे पत्रकार संघटना, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, रुग्णालये व जेष्ठ नागरिक संघटना यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व व्यावसायिक संस्था एकत्र आल्या होत्या.
नागरिकांचे प्रतिपादन
पुढील पाऊल
मोर्चानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, आयएमए व इतर संघटनांनी जिल्ह्यात कायमस्वरूपी डीजे-लेझर बंदीसाठी कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. नागरिकांनीही यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
👉 धुळेकरांनी एकजूट दाखवत आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. या मूक मोर्चामुळे शहरात डीजे–लेझर विरोधातील जनजागृती नव्या टप्प्यावर पोहोचली असून प्रशासन आता कोणते ठोस निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A. (MCJ))
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



