धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्यास १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई आज (१२ ऑगस्ट) सकाळी करण्यात आली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी दत्तात्रय नांद्रे (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती धुळे) यांना तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अटक करण्यात आली. तक्रारदार हे धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक असून त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार आहे. दि. ७ ऑगस्ट रोजी शिक्षण विस्तार अधिकारी नांद्रे यांनी त्यांच्या शाळेस भेट दिली असता विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
![]() |
| - Advertisement - |
त्यानंतर, प्रतिकूल अहवाल वरिष्ठांकडे न पाठविणे आणि शाळेस समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाबाबत अनुकूल वर्तन ठेवण्यासाठी, नांद्रे यांनी स्वतःसाठी तसेच शिक्षण अधिकारी कुवर यांच्यासाठी एकूण १० हजार रुपयांची लाच मागणी केल्याचा आरोप आहे.
या संदर्भात तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान, आरोपी नांद्रे यांनी लाचेची मागणी करीत ती स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती.
आज पंचायत समिती कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी नांद्रे यांनी आपल्या कक्षात तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारीवर्गात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही कारवाई भ्रष्टाचाराविरोधातील कठोर पाऊल म्हणून पाहिली जात आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


