धुळे दर्पण न्यूज :- शहरालगत महिंदळे शिवारातील पांझरा नदीपात्रात तब्बल एक किलोमीटर लांबीचा व 12 ते 15 फूट उंचीचा गॅबियन दगडी बंधारा उभारून नदीचे नैसर्गिक पात्र बाधित करण्याचा आणि शेतजमीन नदीपात्रात वाढवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शिवसेना (ठाकरे गट) यांनी नदीपात्र गिळंकृत केल्याचा आरोप करत धुळे प्रशासनासमोर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  माजी आमदार अनिल गोटे यांनी घटनास्थळी पाहणी करून पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या प्रकरणात भूमाफियांना सत्ताधारी पक्षाचे उघड पाठबळ असल्याचा आरोप करत प्रशासनावर दुर्लक्षाचा ठपका ठेवला. गोटे म्हणाले की, “सन 2015 मध्ये येथे गरीबांसाठी सोसायटी स्थापन करण्यासाठी परवानगीचा अर्ज दाखल झाला होता. मात्र, परवानगीचा उद्देश बदलून आता बेकायदेशीररित्या बंधाऱ्याद्वारे नदीपात्रामध्ये अतिक्रमणाचा प्रकार सुरू आहे.”

- Advertisement -

  त्यांनी पुढे सांगितले की, धुळे शहरात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन, शासनाला रॉयल्टी न देणे आणि नदीपात्राचे नुकसान या गोष्टी सर्रास सुरू आहेत. “प्रशासनाकडून या सर्व बाबींवर कारवाई न केल्याने भूमाफियांना प्रोत्साहन मिळत आहे,” असा आरोप गोटेंनी यावेळी केला.

  घटनास्थळी आंदोलन करताना शिवसैनिकांनी प्रांताधिकारी कार्यालयावरही संताप व्यक्त केला. बंधाऱ्याजवळील शेकडो ब्रास दगडांचा पंचनामा करून तातडीने जप्तीची मागणी करण्यात आली. शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, हा गॅबियन बंधारा नकाने गावाजवळील बेघर वस्तीस संभाव्य पूरधोका निर्माण करू शकतो.

  याबाबत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित भूमाफियांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

- Advertisement -

  या प्रकरणामुळे धुळे शहरातील नदीपात्र संरक्षण, बेकायदेशीर अतिक्रमण व भूमाफियांच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा जनमत जागृत झाले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा राजकीय तसेच कायदेशीर पातळीवर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


- Advertisement -