ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्यांसाठी खासदार शोभाताई बच्छाव यांचा ठाम पाठिंबा

 धुळे दर्पण न्यूज :-  ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभाताई बच्छाव यांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, किमान पेन्शन रक्कम वाढवावी तसेच पेन्शनधारकांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष सुरू असलेल्या पेन्शनधारकांच्या मागण्यांप्रती सहानुभूती व्यक्त करत त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या आंदोलनात खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे, खा. प्रतिभा धानोरकर, खा. बळवंत वानखेडे, खा. राजाभाऊ वाजे, खा. भगरे सर आणि खा. रविंद्र चव्हाण हे खासदारही उपस्थित होते. सर्व खासदारांनी आंदोलकांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पेन्शनधारकांच्या या दीर्घकालीन संघर्षाला संसदेमध्ये आवाज देण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.

  खा. शोभाताई बच्छाव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की,

"ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा लढा म्हणजे सामाजिक न्यायासाठीची हाक आहे. वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता ही केवळ गरज नसून त्यांचा हक्क आहे. या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. या मागण्यांवर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी संसदेमध्ये आम्ही हा मुद्दा जोरकसपणे मांडणार आहोत."

 

- Advertisement -

  देशभरातील लाखो ईपीएस-९५ पेन्शनधारक अत्यल्प पेन्शन रकमेवर जीवन कंठत असून त्यांना केवळ आर्थिक नव्हे तर आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा मिळावी, ही मागणी अत्यंत रास्त आहे. याआधीही अनेक वेळा केंद्र शासनाच्या पातळीवर याबाबत निवेदने देण्यात आली आहेत, मात्र ठोस निर्णय घेतला गेलेला नाही.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  जंतर-मंतरवरील आंदोलन हे केवळ पेन्शन वाढवण्यासाठी नव्हे, तर शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेविरुद्धचा एक संघर्ष आहे. समाजातील जेष्ठ नागरिकांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी खासदारांचा हा पाठिंबा EPS-95 संघर्ष समितीला नक्कीच बळ देणारा ठरणार आहे.

धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -