धुळे दर्पण न्यूज :- नागरिकांना परवानगी, दाखले आणि आवश्यक कागदपत्रांसाठी विविध विभागांची धावपळ करण्याची गरज लवकरच संपणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतच एकाच छताखाली तब्बल ७३ प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. हे केंद्र ऑगस्ट महिन्यात नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे.
वेळ आणि खर्च दोन्हीची बचत
सध्या सण-उत्सव काळात मंडप परवानगी, गणेशोत्सव मंडळ नोंदणी, जाहिरात फलक परवानगी, जन्म-मृत्यू दाखले, ना हरकत प्रमाणपत्र, झोन दाखला, भोगवटा दाखला, हस्तांतरण दाखला, अग्निशमन विभागाचे दाखले अशा विविध परवानग्या घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या विभागांना जावे लागते. त्यानंतर चलन भरण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासते. या प्रक्रियेत नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च या तिन्हींचा अपव्यय होत असल्याची तक्रार वारंवार होत होती.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
एका छताखाली सर्व सुविधा
महापालिकेच्या प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन, मुख्य इमारतीतच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या टपाल स्वीकारण्याच्या कॅबिन पुढील प्रशस्त हॉलमध्ये हे केंद्र सुरु होणार असून, पाच स्वतंत्र काउंटरमधून विविध सेवा पुरवल्या जातील.
या नागरी सेवा केंद्रातून महापालिकेच्या सेवांसह इतर विभागांशी संबंधित ७३ सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांची पायपीट करण्याची गरज भासणार नाही.
![]() |
| - Advertisement - |
१० कर्मचाऱ्यांचा विशेष स्टाफ
सेवा केंद्रात सुमारे १० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा स्टाफ नियुक्त केला जाणार आहे. ते नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन करतील आणि सेवा त्वरित पुरवतील. महापालिकेच्या परवानग्या आणि दाखल्यांसोबतच, इतर शासकीय प्रमाणपत्रेही या केंद्रातून मिळणार आहेत.
ऑगस्टमध्ये सुविधा उपलब्ध
मनपा प्रशासनानुसार, ऑगस्ट महिन्यापर्यंत हे केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होईल. सुरुवातीच्या टप्प्यातच या केंद्रातून नागरिकांना ऑनलाइन व ऑफलाइन, दोन्ही प्रकारे अर्ज सादर करण्याची सोय दिली जाईल.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना पारदर्शक, वेगवान आणि सुलभ सेवा मिळणार असून, नागरी सेवा केंद्र हे ‘वन स्टॉप सोल्यूशन’ ठरणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू मा
ध्यम
![]() |
| - Advertisement - |


